ओळखलंत का या चिमुरडीला?, ही मराठी मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य

ओळखलंत का या चिमुरडीला?, ही मराठी मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य

हल्ली सोशल मीडियावर बरेच सेलिब्रेटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात आणि त्यामुळे ते चर्चेत येत असतात. नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप क्यूट दिसते आहे.

Loading...

भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, शाळेचा पहिला दिवस. आर्य विद्यामंदिर. आनंदी दिवस. जुन्या आठवणी.

Loading...

भूमी पेडणेकरचा नुकताच ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन महिलांची भूमिका त्या दोघींनी साकारल्या होत्या.वयाच्या साठीत शूटींगची सुरुवात करणाऱ्या या शूटर दादींनी अनेक मेडल जिंकले आहेत. या चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा मिळाली.

Loading...

तसेच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.भूमी पेडणेकरचा बाला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. यात तिच्यासोबत आयुषमान खुराणा व यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

Loading...

बाला चित्रपटाव्यतिरिक्त भूमी पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

Editor

110 thoughts on “ओळखलंत का या चिमुरडीला?, ही मराठी मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *