उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरे यांचे सर्जिकल स्ट्राइक

मुंबई/ 1995 मध्ये झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची योजना सरकारने सुरू केली आणि त्यानंतर परराज्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोंढे आले, असे राज ठाकरे यांनी रविवारी रात्री झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात सांगितले. परंतु या मुद्द्यावरून आपले विचार प्रदेशासाठी किंवा कायम वास्तव्यासाठी आपली संस्कृती आणि भाषा आपण स्विकारलेच पाहिजे, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात मांडली. राज ठाकरे यांच्या या बाण्याने उत्तर भारतीयांची मने जिंकली. 
यावेळी राज ठाकरे म्हणाले, तुमच्या राज्यात रोजगार नाही म्हणून तुम्ही इथेच आहे, मी मान्य करतो. मात्र, मराठी राज्यातल्या बेरोजगार तरुणांना डावलून जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते तेव्हा संघर्ष हा अटळ असतो. कुणालाही घालून-पाडून बोलणे आपला हेतू नसून अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात सांगितले. या वेळी उत्तर भारतीयांनी देखील त्यांना दाद दिली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई व महाराष्ट्रात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याची घोषणा उत्तर भारतीय महा पंचायत समितीने केली. जोपर्यंत त्या राज्यात रोजगार निर्माण होत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्यातील नेत्यांना आमदार-खासदारांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे समितीने म्हटले आहे.
पहिल्यांदाच हिंदीतून भाषण: आजवर राज ठाकरे यांनी मराठी बाणा दाखवत हिंदी चॅनल्सवर देखील मराठीतून संवाद साधल्याचे आपण पाहिले असेल. राज ठाकरे यांची हिंदी अतिशय चांगली आणि सुस्पष्ट आहे. या वेळी राज ठाकरे यांनी संपूर्ण एक तास हिंदीत भाषण केले आणि उत्तर भारतीयांची मने जिंकून घेतली.

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...