आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांचा प्रश्न, खेकड्यामुळे धरण कसं फुटतं ?

आदित्य ठाकरे यांनी सोलापुरात ‘आदित्य युवा संवाद’ कार्यकमातंर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने अवघड थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकतं, या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं.
आदित्य ठाकरे म्हणाले,

Loading...

“एखाद्या ठिकाणी एखादी जागा खेकड्यांनी भुसभुशीत केली असेल तर धरण फुटू शकतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. धरण फुटण्यासाठी अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक कारण म्हणजे खेकडे असू शकतात”

आदित्य ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी जे विविध परीक्षा पास होतात, त्यांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईत जावं लागतं. त्यांना IT मधील नोकऱ्या सोलापुरात उपलब्ध व्हाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी आदित्य यांनी अशा कंपन्या सोलापुरात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...