अमिताभ आणि कादर खान यांच्या मैत्रीत का आला होता दुरावा…जाणून घ्या मराठी मीडिया वर

अमिताभ बच्चनसोबत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणा-या कादर खान यांनी त्यांच्या ‘अमर अकबर एंथनी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘शराबी’ या चित्रपटांचे डायलॉगही लिहिले होते. पण कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता, पण त्यांची ही इच्छा अद्याप पूर्ण झाली नाही.

Loading...

एका मुलाखतीत कादर खान म्हणाले होते, “अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला ‘जाहिल’ हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, पण खुदाला कदाचित दुसरेच काही मान्य होते.” कादर खान यांनी सांगितल्यानुसार, याचकाळात ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते, ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

जेव्हा अमिताभ आणि कादर खान यांच्या मैत्रीत आला होता दुरावा…

एकेकाळी कादर खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री अतिशय घट्ट होती. पण राजकारणावरुन दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. एका मुलाखतीत कादर खान म्हणाले होते, ”जेव्हापासून ते (अमिताभ बच्चन) खासदार बनले तेव्हापासून मी आनंदी नाहीये. राजकारण असे क्षेत्र आहे, जे व्यक्तीला पुर्णतः बदलून टाकते. जेव्हा ते राजकारणातून परतले तेव्हा ते पुर्वीचे अमिताभ नव्हते.’ कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला होता, पण बिग बींनी त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते.

आमिताभ बच्चन आणि कादर खान हे समीकरण रुपेरी पडद्यावर हिट होतं. या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र नंतर या दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. राजकारणामुळे अमिताभ बच्चन माणूस म्हणून पूर्णपणे बदलला अशी खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. ‘अमिताभनं मला राजकरणापासून दूर ठेवलं मात्र स्वत: त्याकाळी राजकारणात गेला. त्याचा हा निर्णय मला अजिबात पटला नव्हता. मी नाराज होतो. मी ज्या अमिताभला ओळखत होतो तो हा नव्हताच. आमच्यातल्या मैत्रीमुळे मी त्याला नेहमीच प्रेमानं अमित म्हणून हाक मारायचो, मात्र नंतर मी त्याला इतरांप्रमाणे अमितजी अशी आदरानं हाक मारावी अशी त्याची इच्छा होती. एक निर्माता मला म्हणाला होता अमिताभ आता खूप मोठा व्यक्ती झाला आहे त्याला अमित बोलणं योग्य नाही तू अमीतजी म्हणायला लाग मला त्याचं बोलणं आवडलं नाही. त्यानंतर आमच्या मैत्रीतील दरी वाढत गेली. मी कधीही त्याच्याजवळ गेलो नाही असं कादर खान ६ वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...